Breaking News

वर्धा जिल्हयातील पोलीस कर्मचा याची विदेशात वर्णी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी (पवन चंबुलवार)- वर्धा जिल्हा पोलीस दलात पोलीस नायक म्हणून कार्यरत असलेले कूलदीप टांकसाळे यांची विदेश मंत्रालय दिल्ली येथून आफ्रिका खंडातील घाना येथे  निवड झाली आहे. ते पुढील 2 वर्षे घाना देशाची राजधानी अक्रा येथे भारतीय राजदूतावासात आपले कर्तव्य करतील.

ते सन 2007 पासून वर्धा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून सायबर सेल मध्ये काम करीत असतांना त्यांनी सायबर जनजागृती, सायबर गुन्हे प्रतीबंध, तपास व गुन्हे उघडकीस आणण्यात आपला सहभाग नोंदवीला आहे. या उपलब्धीच्या आधारे त्यांना मिनीस्ट्री आॅफ एक्स्टर्नल अफेअर्स, दिल्ली येथे व तेथून घाना येथे नियूक्त करण्यात आले आहे.

सध्या ते दिल्ली येथे नियूक्तीस असून लवकरच विदेशात रवाना होतील. विदेश मंत्रालयातून परदेशात निवड होणारे वर्धा जिल्हा पोलीस दलाचे  ते प्रथमच कर्मचारी आहेत.

त्यांचे श्री. निलेश मोरे प्रभारी पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. निलेश ब्राह्मणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, सह वर्धा जिल्हा पोलीस दलाचे सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं