Breaking News

उपचाराअभावी व अन्न-पाण्यावाचून रस्त्यावरच झोपणाऱ्या इसमाला जिव्हाळाची मदत

वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार
:- मागील 8 दिवसांपासून रिंग रोड वरील कारला स्वेअर परिसरात एक जखमी व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होऊन रस्त्यावरच राहत असल्याचे तेथील रहिवाश्यांच्या लक्षात आले. सदर रुग्णाविषयी जिव्हाळाला माहिती झाल्या बरोबरच जिव्हाळा टीमने तिथे जाऊन त्यांची भेट घेतली असता लक्षात आले की सदर इसम हा मूळचा बिहार मधील असून इकडे कामासाठी म्हणून आला होता. *या रुग्णाच्या डोक्याला मोठी जखम झालेली होती व त्यावर योग्य उपचार न मिळाल्याने त्या जखमेवर जंतूंचा संसर्ग झालेला होता व त्यातूनच या रुग्णाचे मानसिक संतुलनही ढासळले होते. त्याच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यावर लक्षात आले की मागील अनेक दिवसांपासून त्याने जेवणही केलेले नव्हते व एवढ्या कडाक्याच्या थंडीतही ही व्यक्ती रस्त्याच्या कडेलाच झोपून राहत होती.*

लगेच जिव्हाळा टीमने त्याच्या *जेवणाची व ब्लॅंकेट* ची व्यवस्था केली. त्यानंतर दैनिक देशोन्नती चे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री संजयजी जाधव यांच्याशी संपर्क करून सदर रुग्णाच्या परिस्थितीची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार दुसऱ्याच दिवशी या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे उपचारासाठी जिव्हाळा टीम घेऊन गेली व त्याला तिथे भरती करवून देण्यात आले. आता त्याच्या डोक्यावरील जखमेवर उपचार सुरू असून श्री संजयजी जाधव हे त्या रुग्णावर व त्याच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत.

कोई टिप्पणी नहीं